भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा नुकताच विवाह झाला. लग्नानंतर मेहंदी, संगीत यांसारखे विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर या नव दाम्पत्याने कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले.

वाचा : ‘दशक्रिया’ऐवजी खपवली जातायतं ‘ज्युली २’चं तिकीटं?

कोल्हापूर आणि इंदूर येथील राजघराण्यांशी सागरिकाचे नाते आहे. त्यामुळे तिच्याशी लग्न केल्यानंतर झहीर आता कोल्हापूरचा जावई झाला आहे. यामुळेच, हे नवदाम्पत्य करवीर निवासिनी अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहचले. यावेळी देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. झहीर – सागरिकाला पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.

वाचा : ‘टार्झन: द वंडर कार’ या चित्रटातील ‘त्या’ सुपरकारची अवस्था पाहिलीत?

सागरिका ही अभिनेत्री होण्याआधी राजकुमारी आहे. याविषयी एका मुलाखतीत सागरिका म्हणालेली की, ‘होय, मी राजकुमारी आहे. कोल्हापूरमधील घराण्याशी माझे नाते आहे. अशा राजघराण्यात जन्माला आल्याने मी स्वतःला नशीबवान समजते. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना आमच्या घराण्याच्या इभ्रतीला धक्का पोहचणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेते. मी कोल्हापूरची असले तरी माझे बालपण मुंबईतच गेले. त्यानंतर मी बोर्डिंगमध्ये शिकण्यासाठी गेले, असे सागरिकाने सांगितले होते.

View this post on Instagram

A post shared by Sagarika Z Ghatge (@sagarikaghatge)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.