‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी झायरा वसीम हिने कलाविश्व सोडलं. ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटानंतर तिने धर्माचं कारण देत अभिनय क्षेत्राला रामराम केला. त्यानंतर आता तिने चाहत्यांना कळकळीची विनंती केली आहे. सोशल मीडियावर माझे फोटो पोस्ट करू नका आणि केले असल्यास ते डिलिट करा अशा विनंती झायराने तिच्या फॅन पेजेसना केली आहे. यासंदर्भात तिने पोस्ट शेअर करत त्यामागील कारणसुद्धा सांगितलं आहे.
‘माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात तुम्ही दिलेली साथ मी कधीही विसरणार नाही. मी माझ्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मी अभिनय क्षेत्र सोडलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील माझे फोटो डिलिट करा. मी स्वत: इंटरनेटवरून ते सर्व फोटो काढू शकत नाही. त्यामुळे माझ्या फॅन पेजेसना विनंती करते की त्यांनी माझे फोटो डिलिट करावेत.’
A message I had shared with the fan pages last year. Sharing it again just in case you haven’t read it before. Thenks :)) https://t.co/TYN05wyV1p pic.twitter.com/z55BR7cqd3
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) November 21, 2020
आणखी वाचा : तेव्हा सलीम खान यांनी भोगली सलमानची शिक्षा; कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
झायराने सोशल मीडियावर ‘अभिनय क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते’ असे लिहित बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. झायराने ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचंही भरपूर कौतुक झाले. आमिर खानने अनेकदा तिच्या अभिनयकौशल्याची स्तुती केली आहे.