बॉलीवूड सिनेसृष्टीत नायिका बनायचे असेल तर ‘गोरा’ रंग अजूनही महत्त्वाचा ठरतो. रंगामुळे आणि दिसण्यामुळे आजवर अंजली पाटील, प्रियांका चोप्रा, अदीती राव हैदरी, काजोल यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी चित्रपट सोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या यादीत आता झरिन खान हे एक नविन नाव जोडले गेले आहे.

अभिनेत्री झरिनच्या बाबतीत असाच परंतु काहीसा वेगळा किस्सा घडला आहे. झरिनला तिच्या अती गोऱ्या वर्णामुळे चित्रपट नाकारला गेला होता. सध्याच्या बॉलिवूड ट्रेंडचा विचार करता सर्वसाधारणपणे गोऱ्या रंगाच्या अभिनेत्रींना चित्रपटांमध्ये अधिक संधी दिली जाते. या प्रकाराबाबत आजवर अनेक अभिनेत्रींनी तक्रार केली आहे. परंतु झरिनला चक्क तिच्या गोऱ्या रंगामुळेच नकार मिळाला.

आणखी वाचा : कतरिनाची हीरोपंती, वाचवला कॅमेरामॅनचा जीव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झरिनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. तिला एका चित्रपटासाठी विचारण्यात आले होते. यात झरिन खेडेगावातील महिलेच्या भूमिकेत होती. शेवटी तिला चित्रपटाच्या टीमकडून नकार कळवण्यात आला. ‘खेडेगावातल्या मुली या उजळ वर्णाच्या नसतात. तुझा वर्ण खूपच उजळ आहे त्यामुळे आम्ही तुला या चित्रपटात अभिनय करण्याची संधी देऊ शकत नाही असे म्हणत तिला नकार दिला गेला होता.