अभिनेता ह्रतिक रोशनशी कायदेशीर लढा सुरू असतानाच अभिनेत्री कंगना रणौत हिला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ज्या एका प्रोजेक्टवरून कंगना खूपच उत्साहित होती. त्यावरच तिला पाणी सोडावे लागले आहे. सई कबीरच्या ‘डिव्हाईन लव्हर्स’मधून कंगनाने माघार घेतली आहे. काही इंग्रजी संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ‘डिव्हाईन लव्हर्स’मध्ये अभिनेता इरफान खानची भूमिका आपल्यापेक्षा मोठी आहे. त्यामुळे तिने यामधून माघार घेतली आहे.
कंगनाने सुरुवातीला ‘डिव्हाईन लव्हर्स’साठी होकार दिला होता. फक्त त्याचे शूटिंग काही महिन्यांनंतर सुरू करण्याची विनंती तिने केली होती. पण आता तिने यामधून माघार घेतली आहे. त्यामुळे ‘डिव्हाईन लव्हर्स’मध्ये आता इरफानसोबत अभिनेत्री झरीन खान दिसणार आहे. आम्हाला या व्यक्तिरेखेसाठी जशी अभिनेत्री हवी होती. त्यात झरीन एकदम व्यवस्थित बसते, असे सई कबीरने म्हटले आहे. येत्या सप्टेंबरमध्ये याचे शूटिंग सुरू होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th May 2016 रोजी प्रकाशित
… आणि ‘डिव्हाईन लव्हर्स’मधून कंगनाने घेतली माघार
'डिव्हाईन लव्हर्स'मध्ये आता इरफानसोबत अभिनेत्री झरीन खान दिसणार
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 11-05-2016 at 14:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zareen khan to replace kangana in divine lovers