क्रिएटिव आय लिमिटेड प्रॉडक्शन हाऊस हे सर्वात मोठे मनोरंजन चैनल “झी टीव्ही” वर आपल्या नवीन शो घेऊन येत आहे. झी टीवीवर ‘इश्क सुभान अल्लाह’ ही नवी मालिका सुरू होत आहे. क्रिएटिव आय लिमिटेड प्रॉडक्शन हाऊसने या मालिकेची निर्मिती केली आहे.
कबीर आणि झाराची एक प्रेमकथा म्हणजे ‘इश्क सुभान अल्लाह’. दोघेही इस्लामचे अनुयायी आहेत, जे ‘कुरान’ ची व्याख्या वेगळ्या पद्धतीने करुन देतात. कबीर हा मौलवी आहे जो सर्वमान्यपणे पारंपारिक नैतिक आचारसंहिता पाळतो, तर झारा एक सुशिक्षित तरूण स्त्री आहे जी अल्लाहच्या शिकवणुकींना अत्यावश्यक जीवनशैली, व्यावहारिकता, तर्कशक्ती, आधुनिकता, लिंग समानता, न्याय आणि निष्पक्षता यातून पाहत असते. झारा तिहेरी तलाक ही प्रथा अ-इस्लामिक मानते. कारण त्याचा कुराणमध्ये कुठेच उल्लेख नाही.
तिच्या मते, एक तलाक किमान ६० दिवसांच्या कालावधीत प्रशासित केला पाहिजे, दोन्ही पक्षांनी त्यांच्या मतभेदांशी जुळवून घेण्यासाठी पुरेशी संधी दिली पाहिजे. झारा आणि कबीरच्या अगदी उलट विचारांच्या शैलीचे प्रदर्शन करताना. दोन वेगळ्या विचारांची माणसं कशी एकत्र येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. झी टीवी वर १४ मार्च पासून रात्री १० वाजता ‘इश्क सुभान अल्लाह’ ही मालिका पाहता येणार आहे.
कलाकार-
अदनान अब्बास खान – कबीर
इशा सिंग – झारा
विनय जैन – शाबाज
एम जहीर – पीर साहब
सुनील पुशकरना – काजी
शालिनी अरोरा – सलमान
पंकज कानसरा – आयशा
धीरज के. राय – काशन