‘द शो मस्ट गो ऑन’ पण प्रथम सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती काळजी घेऊन हॉरर कॉमेडी ‘झोंबिवली’ या मराठी सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाच्या चित्रिकरणाला उत्साहाने सुरुवात केली आहे. ‘झोंबिवली’ या सिनेमाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला आणि सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक सर्व खबरदारींसह सिनेमाचे शूट देखील सुरू झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमांतील नाविन्य, अनोख्या कथा आणि वेगवेगळ्या विषयांवर आधारित सिनेमांची होणारी निर्मिती पाहता मराठी सिनेमांनी अनेकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांनीही त्या सर्व सिनेमांना खूप प्रेम दिले आहे आणि पाठिंबा दर्शविला आहे. ‘झोंबिवली’ सिनेमाचे पहिले पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र त्याचीच चर्चा झाली होती. प्रेक्षकांनी या दोन्ही गोष्टींना प्रचंड प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सिनेमाप्रती उत्सुकता दर्शवली. झोंबींचे उत्कृष्ट व्हिज्युअल, बॅकग्राऊंड म्युझिक यामुळे मोशन पोस्टरला एक वेगळा इफेक्ट मिळाला होता आणि त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता जास्त प्रमाणात वाढली. तसेच या सिनेमाची जबरदस्त स्टारकास्ट आणि प्रतिभावान दिग्दर्शक यांची सोबत देखील या सिनेमाला लाभली आहे.

निर्मात्यांनी संपूर्ण टीमच्या सुरक्षिततेसाठी PPE किट्स, मास्क, ग्लोव्हस आदी सर्व गोष्टींची सोय केली आहे व त्याचा वापर करूनच शूटिंगची सुरुवात केली आहे. त्याचबरोबर प्रॉडक्शन हाऊसने ‘कोविड ऑफिसर’ (हेल्थ केअर एक्स्पर्ट)ची सुद्धा सोय केली आहे जो टीम सोबत असणार आहे आणि संपूर्ण टीम नियमांचे पालन करते आहे की नाही याची खबरदारी घेणार आहे.

सारेगम प्रस्तुत ‘झोंबिवली’ चित्रपटाची निर्मिती Yoodlee Films यांनी केली आहे. तर सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zombivli marathi horror comedy film shooting starts ssv
First published on: 04-09-2020 at 18:02 IST