बायको : तुम्ही दळण कुठून दळून आणलं?
नवरा : जिथून नेमही दळून आणतो, तिथूनच आणलं.
बायको : याचा अर्थ, तुम्ही गहू ठेऊन कुठेतरी फिरायला गेला होतात. बरोबर ना?
नवरा : अगं! तिथेच उभा होतो, बाई!
बायको : खोटं बोलू नका!
नवरा : तिथेच होतो, समोरच दळून घेतलं. काय झालं ते तर सांग.
बायको : कसं दळण दळून आणलं आहे? सगळ्या पोळ्या जळाल्या.
हे ऐकून नवरा शॉकमध्ये जातो…