एक स्पर्धा होती, त्यामध्ये

दडपण, भीती, रहस्य, गूढ, अनिश्चितता, हुरहूर, उत्कंठा, शांतता, समाधान, स्वातंत्र्य, आनंदकल्लोळ, खुलेपणा, मोकळेपणा, स्वच्छंदपणा, जल्लोष, हिंसेची शक्यता…..

अशा सर्व भावनांचे प्रदर्शन एका वाक्यात झाले पाहिजे.

पुणेकराला प्रथम पारितोषिक मिळालं. त्याने लिहीलं होतं……

“माझी बायको सकाळपासून बोलत नाहीये.”