20 September 2020

News Flash

मतदारांना भांडी वाटण्यासाठी निवृत्त पोलिसाचा वापर

निवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर घागरे यांच्या घरात १ हजार फ्राईंग पॅन सापडल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

| October 13, 2014 01:29 am

निवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर घागरे यांच्या घरात १ हजार फ्राईंग पॅन सापडल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. ना. म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यातून निवृत्त झालेले घागरे यांच्या वरळी कोळीवाडा येथील घरात मतदारांना वाटण्यासाठी भांडी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने घरात छापा घातला. त्यावेळी घरात एक हजार फ्राईंग पॅन, प्रेशर कुकर आढळून आले. हळदी कुकुंच्या कार्यक्रमानिमित्त ही भांडी आणल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हळदीकुकूंच्या नावाखाली मतदारांना वाटण्यासाठी ही भांडी आणल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 1:29 am

Web Title: 1000 frying pans seized from ex policemans house
Next Stories
1 एफएसआयचा चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात
2 पनवेलमध्ये मताचा रेट ५००, १००० रुपये
3 मुंबईत दोन ठिकाणी २८ लाख रुपये जप्त
Just Now!
X