१८४ पैकी १२१ जण सेवेत; दोन वेतनवाढ रोखल्या

मुंबई: टाळेबंदीत कर्तव्य न बजावणाऱ्या  बेस्ट उपक्र मातील  बडतर्फ १८४ पैकी १२१ चालक-वाहक कामावर रुजू झाले आहेत. बडतर्फ आणि वेतनवाढ रोखण्याबाबत कर्मचाऱ्यांनी अपील केले होते. मात्र, त्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्यात आल्या आहेत.

टाळेबंदीतही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्टसेवा सुरू होती. मुंबईबरोबरच ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल, विरार येथून बसफे ऱ्या देताना बेस्टला मनुष्यबळ अभावाचा सामना करावा लागला. परिणामी एरवीच्या तुलनेत निम्म्याच

फेऱ्या देता येत होत्या. वारंवार समज देऊनही चालक-वाहक कर्तव्यावर रुजू न झाल्याने १८४ जणांवर बडतर्फीचा बडगा उचलण्यात आला. बडतर्फ के ल्यानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी कर्मचारी संबंधित विभागाकडे दाद मागू शकतात. त्यानुसार सुनावणीही होते.

दोन वेतनवाढ किं वा त्यापेक्षा जास्त वेतनवाढ रोखून त्या कर्मचाऱ्याला सेवेत पुन्हा रुजूही करता येते. त्यानुसार बडतर्फ चालक-वाहकांनी अपील के ल्यानंतर आतापर्यंत १८४ पैकी १२१ जणांना सेवेत रुजू करण्यात आले. मात्र त्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्यात आल्या आहेत. ऊर्वरित कर्मचाऱ्यांच्या अपिलावरही सध्या सुनावणी सुरू आहे.

बेस्टच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच विद्युत विभाग, अभियंता विभाग, सुरक्षा रक्षक यांसह अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांवरही बडतर्फीची कारवाई झाली आहे. ही कारवाई करताना काहींच्या अपिलावर सुनावणी होऊन त्यांचीही वेतनवाढ रोखण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी या कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागू असे त्यांनी सांगितले.