News Flash

भांडुपमध्ये क्रिकेट खेळताना ह्रदयविकाराच्या झटक्याने २४ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

भांडुपमध्ये २३ डिसेंबर रोजी टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच स्पर्धा सुरु असताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच भांडुप येथे क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असून वैभव केसरकर (वय २०) असे या तरुणाचे नाव आहे.

भांडुपमध्ये २३ डिसेंबर रोजी टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेदरम्यान गावदेवी संघाकडून खेळणारा वैभव केसरकर हा फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र, छातीत दुखू लागल्याने तो तंबूत परतला. काही वेळाने तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात परतला असता त्रास वाढला. अखेर त्याला तातडीने जवळील भावसार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वैभवच्या निधनामुळे कुटुंबीयांना आणि मित्रांना धक्का बसला आहे. वैभवला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अकाली निधनाने आम्हा सर्वांना धक्का बसला, अशी प्रतिक्रिया वैभवच्या मित्राने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 11:23 am

Web Title: 24 year old batsman dies heart attack while playing in bhandup
Next Stories
1 पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
2 पेइंग गेस्ट मुलींचे चोरुन शुटींग करणारा घरमालक अटकेत
3 निवृत्त अधिकाऱ्यांवर सरकारची भिस्त!
Just Now!
X