लोकसत्ता , प्रतिनिधी

नवी  मुंबईत  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे   शहरात  १० दिवसाची टाळेबंदी ४ जुलैपासून सुरू होणार आहे. एकीकडे शहरात करोनाचा कहर सुरू असताना त्यात पावसाची भर पडली असून सकाळपासूनच शहरात जोरदार पाऊस पडला. आज २५७ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची  एकूण संख्या ७३४५  झाली आहे.

नवी मुंबई शहरात आज आठ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या २३२ झाली आहे. शहरात करोनामुक्त होण्याचा दर चांगला  असून शहरात आतापर्यंत तब्बल ४,११२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.तर ९२८ करोना तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. शहरात नेरुळमध्ये सर्वाधिक १०६.४ मिमी पावसाची नोंद झाली असून शहरात सरासरी ८८.४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.