मुंबईतील करोना रुग्णांमध्ये बुधवारी काहीशी वाढ झाली. गेल्या २४ तासांत ५०३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाला, तसेच ३९७ रुग्ण एका दिवसात बरे झाले. मात्र मुंबईतील एकू ण चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचे प्रमाण ११ टक्क्यांच्या खाली आले आहे.
मुंबईतील एकूण बधितांची संख्या ३,१०,१३४ झाली आहे, तर आतापर्यंत २ लाख ९२ हजाराहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ५६२५ रुग्ण उपचाराधीन आहेत. रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी ५६३ दिवस झाला आहे. करोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या ११,३७३ झाली आहे. आतापर्यंत २८ लाख ४७ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 4, 2021 12:25 am