19 September 2020

News Flash

राज्यात नऊ कोटी हिंदू, तर सव्वा कोटी मुस्लीम

राज्याच्या एकूण ११ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे नऊ कोटी हिंदू, तर सव्वा कोटी मुस्लिमांची लोकसंख्या असल्याची माहिती धर्मनिहाय जनगणनेत प्रसिद्ध करण्यात आली आहे.

| August 27, 2015 04:57 am

राज्याच्या एकूण ११ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे नऊ कोटी हिंदू, तर सव्वा कोटी मुस्लिमांची लोकसंख्या असल्याची माहिती धर्मनिहाय जनगणनेत प्रसिद्ध करण्यात आली आहे. दहा वर्षांची तुलना करता मुस्लिमांच्या लोकसंख्यावाढीचे प्रमाण हे २५ टक्क्यांच्या आसपास तर, हिंदूंचे प्रमाण हे १५ टक्के आहे. ख्रिश्चन, बुद्ध किंवा जैनांच्या टक्क्यांत फार काही फरक पडलेला नाही.
२०११ मधील जनगणनेची धर्मनिहाय आकडेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. राज्यातील मालेगाव आणि भिवंडी-निजामपुरा या दोन महानगरपालिका मुस्लीमबहुल महानगरपालिका ठरल्या आहेत. मालेगाव महापालिका हद्दीतील एकूण लोकसंख्या चार लाख ८१ हजार असून, त्यापैकी सर्वाधिक ३ लाख ७९ हजार मुस्लीम धर्मीयांची लोकसंख्या आहे, तर ८९ हजार हिंदूंची लोकसंख्या आहे. भिवंडी-निजामपुरा महापालिका हद्दीतील एकूण लोकसंख्या सात लाख नऊ हजार असून, यापैकी ३ लाख ९७ हजार मुस्लीम नागरिक, तर २ लाख ७९ हजार हिंदूंची लोकसंख्या आहे.

मुंबई ९३ लाख
२०११च्या जनगणनेनुसार मुंबई महानगरपालिका हद्दीतील लोकसंख्या ९३ लाख ५६ हजार ९६२ होती. यापैकी ६३ लाख हिंदू, तर १८ लाख मुस्लिमांची लोकसंख्या होती. बुद्ध (४ लाख, ६९ हजार), ख्रिश्चन (३ लाख २२ हजार), तर शीख (४७ हजार) लोकसंख्या आहे.

जनगणना
हिंदू – २००१ जनगणना लोकसंख्या ७ कोटी ७८ लाख
२०११ मध्ये ही आकडेवारी ८ कोटी ९७ लाख
मुस्लीम – २००१ जनगणना एक कोटी ०२ लाख
२०११ जनगणना – एक कोटी २९ लाख
ख्रिश्चन – २००१ जनगणना – १० लाख ५८ हजार. २०११ जनगणना – १० लाख, ८० हजार
बुद्ध – २००१ जनगणना – ५८ लाख, ३८ हजार, २०११ जनगणना – ६५ लाख, ३१ हजार
शीख – २००१ जनगणना – २ लाख १५ हजार, २०११ जनगणना – २ लाख, २३ हजार
जैन – २००१ जनगणना – १ लाख ३० हजार, २०११ जनगणना – १ लाख, ४० हजार.
महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या – २००१ जनगणना – ९ कोटी ६८ लाख, २०११ – ११ कोटी २३ लाख.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 4:57 am

Web Title: 9 crore hindus where as1 25 crore muslim living in maharashtra
Next Stories
1 व्हिवा लाउंजमध्ये आज अमृताशी गप्पा
2 मुंबईत २० टक्के पाणीकपात सुरू
3 कोल्हापूरची टोलवसुली कायमची बंद करणार
Just Now!
X