News Flash

मुंबई – खार रोडवर इमारतीचा भाग कोसळला, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी

सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही

मुंबईतील खार रोड येथे एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. खार रोड क्रमांक १७ वर ही इमारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पायऱ्यांचा भाग कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्याचं काम सध्या सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी क्रॉफर्ड  मार्केटमध्ये लोहार चाळीत तीन मजली युसूफ इमारतीचा भाग कोसळला होता. रात्री सव्वा नऊच्या सुमारास या इमारतीच्या मागच्या बाजूचा भाग कोसळला. यात ढिगाऱ्याखाली दोन ते तीन जण अडकले होते.अग्निशमन दलाच्या चार गाडय़ा व पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ढिगाऱ्याखालून दोन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू होते. ही इमारत म्हाडाची असल्याचे सांगितले जाते. खबरदारीचा उपाय म्हणून युसूफ इमारतीबरोबरच त्याला लागूनच असलेली द्वारकादास इमारतही रिकामी करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 2:29 pm

Web Title: a part of a staircase of a building collapsed in khar sgy 87
Next Stories
1 धक्कादायक! जुहूच्या हॉटेलमध्ये MBA झालेल्या तरुणीला इंटरव्ह्यूसाठी बोलवून बलात्कार
2 शिवसेना-भाजपा युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, लवकरच घोषणा करु – चंद्रकांत पाटील
3 चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या स्कूल बस अटेंडंटला १० वर्षांची शिक्षा
Just Now!
X