23 April 2019

News Flash

मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला अपघात

मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला अपघात झाला आहे

प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला अपघात झाला आहे. चुनाभट्टी येथे गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. सुदैवाने सुधीर गाडगीळ यांना कोणतीही दुखापत झालेली नसून ते सुखरुप आहेत. मिळालेल्या माहितीनुार, चुनाभट्टी येथे चढावर पुढच्या गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात झाला.

चढावर पुढची गाडी अचानक थांबल्यानं मागून येणाऱ्या चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातात सुधीर गाडगीळ यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने सुधीर गाडगीळ आणि चालक सुखरुप आहेत.

First Published on August 10, 2018 2:24 pm

Web Title: accident of sudhir gagdil car