News Flash

हिरेन हत्या वाझे, शर्मा यांच्या सांगण्यावरूनच

या गुन्ह्य़ांत सहभागी अन्य आरोपींच्या भूमिकेबाबत माहिती मिळवायची आहे.

व्यावसायिक मनसुख हिरेन

अन्य आरोपींची कबुली, एनआयएचा न्यायालयात दावा

मुंबई : व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली अन्य आरोपींनी दिल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी विशेष न्यायालयात केला. या वेळी अटकेत असलेले बडतर्फ  पोलीस निरीक्षक सुनील माने यांना विशेष न्यायालयाने पुन्हा एनआयए कोठडी सुनावली.

या गुन्ह्य़ांत सहभागी अन्य आरोपींच्या भूमिकेबाबत माहिती मिळवायची आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या माने यांना पुन्हा एनआयए कोठडी देण्याची विनंती तपास यंत्रणेने विशेष न्यायालयाला केली होती. सोमवारी विशेष न्यायालयाने एनआयएची विनंती मान्य करत माने यांना पुन्हा एनआयए कोठडी सुनावली.

शर्मा यांच्याआधी एनआयएने संतोष शेलार, आनंद जाधव यांना अटक केली होती. या दोघांनी चौकशीदरम्यान मनसुख यांची हत्या वाझे, शर्मा यांच्या सांगण्यावरून केल्याचे कबूल केले. अलीकडेच जप्त केलेल्या लाल रंगाच्या तवेरा गाडीमध्ये मनसुख यांची हत्या करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले, असा दावा एनआयएच्या वकिलाने न्यायालयात केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 2:43 am

Web Title: accused confessed mansukh hiren murder by order of sachin waze and pradip sharma zws 70
Next Stories
1 Coronavirus : मुंबईत करोनाचे ५२१ नवे रुग्ण, ७ मृत्यू
2 ‘त्या’ मद्यविक्रेत्यांना व्यवसाय करू द्या
3 डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून ७५०० नमुने
Just Now!
X