28 February 2021

News Flash

व्यावसयिक स्पर्धेमुळे सुशांत सिंह डिप्रेशनमध्ये गेला होता याची चौकशी होणार-अनिल देशमुख

मुंबई पोलीस हा अँगल तपासणार आहेत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृत्यू गळफास लागल्याने झाला असं पोस्टमॉर्टेमच्या अहवालात स्पष्ट झालं आहे. मात्र तो क्लिनिकल डिप्रेशमध्ये होता. ज्यातून ते आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं अशा बातम्या काही प्रसारमाध्यमं चालवत आहेत. खरंच व्यावसायिक स्पर्धेमुळे तो क्लिनिकल डिप्रेशनमध्ये गेला होता का? याचीही चौकशी केली जाईल असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलीस यासंदर्भातली चौकशी करतील असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला नैराश्याने ग्रासले होते असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी रविवारी वर्तवला होता. दरम्यान डिप्रेशनमुळेच सुशांतने असे टोकाचे पाऊल उचलले असे वृत्त काही प्रसार माध्यमांनी चालवले. त्याची दखल घेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे खरंच झाले होते का याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान आज सुशांतच्या पार्थिवावर विलेपार्ले येथे अंत्यंस्कार करण्यात आले. सुशांतने पवित्र रिश्ता या मालिकेपासून त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. काय-पो-छे, शुद्ध देसी रोमान्स, पीके, छिछोरे यांसारख्या सिनेमांमध्ये त्याने वैविध्यपूर्ण भूमिका केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 9:24 pm

Web Title: actor sushant sing rajput allegedly suffered from clinical depression because of professional rivalry mumbai police will probe this says anil deshmukh scj 81
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 ‘मला त्याच्या नैराश्य बद्दल माहित होते. पण..’, सुशांतच्या फिटनेस कोचचा खुलासा
2 सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोल करण्यांवर भडकली क्रिती सेनॉनची बहिण
3 Video : एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये आईच्या आठवणीने भावूक झाला होता सुशांत
Just Now!
X