26 February 2021

News Flash

वातानुकूलित लोकलला प्रवाशांची प्रतीक्षाच

२५ दिवसांत ३४१ तिकिटे, ३१५ पासची विक्री

२५ दिवसांत ३४१ तिकिटे, ३१५ पासची विक्री

मुंबई : अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून वातानुकू लित लोकल गाडी सुरू करण्यात आली असली तरी २५ दिवसांनंतरही या गाडीला अल्प प्रतिसाद आहे. आतापर्यंत फक्त ३४१ तिकिटे व ३१५ पासचीच विक्री झाली आहे.

गेल्या सात महिन्यांपेक्षाही जास्त पश्चिम रेल्वेवरील वातानुकू लित लोकल बंद होती. १५ ऑक्टोबरपासून वातानुकू लित लोकल सुरू झाली. सुरुवातीला या लोकलच्या १० फे ऱ्या होत होत्या. नुकत्याच आणखी दोन फे ऱ्या वाढवण्यात आल्या. फे ऱ्या जरी वाढवण्यात आल्या,तरीही प्रवासी मात्र मिळालेले नाहीत. एका वातानुकू लित लोकलची प्रवासी क्षमता ५,९६४ आहे. परंतु करोनाकाळात एका लोकलमधून ७०० प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असे गणित रेल्वेने मांडले आहे. परंतु या वातानुकू लित लोकल गाडीला खूपच अल्प प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीत, ऑक्टोबरच्या १५ दिवसांत १७९ तिकीट आणि १९७ महिन्यांचे पास विक्रीला गेले. त्यातून ४ लाख ६९८ उत्पन्न मिळाले. नोव्हेंबरमध्ये १६२ तिकिटे व ११८ पास प्रवाशांनी घेतले आहेत. शनिवार व रविवारीही वातानुकू लित लोकल धावते. परंतु  या दिवशीही प्रवासी फिरकलेले नाहीत. १ नोव्हेंबरला ५ तिकिटे व १२ पासची विक्री झाली. तर ८ नोव्हेंबरलाही अवघी ४ तिकिटे व ९ पास प्रवाशांनी घेतल्याचे सांगितले. पश्चिम रेल्वेला आतापर्यंत एकू ण ६ लाख ५५ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. करोनाचा संसर्ग झपाटय़ाने पसरू नये यासाठी सरकारी, खासगी कार्यालयांबरोबरच खासगी वाहनांमधील वातानुकू लित यंत्रणा बंद ठेवा किं वा त्याच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना शासनाकडून मार्चपासून करण्यात आल्या. टाळेबंदी होताच साधारण २० मार्चपासून पश्चिम  वातानुकू लित लोकलची सेवाही बंदच ठेवण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 2:13 am

Web Title: air conditioned local train get low response from passengers zws 70
Next Stories
1 पूर्व मुक्त मार्गाचा ठाणे शहरापर्यंत विस्तार
2 शाळा सुरू करताना व्यवस्थापनापुढे आव्हानांचे डोंगर!
3 मुंबईत १०६९; ठाणे जिल्ह्य़ात ५६५ नवे रुग्ण
Just Now!
X