News Flash

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

पाटील यांनी गुरुवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आमदार नरेंद्र पाटील यांना भाजपचे लागलेले वेध लक्षात घेता त्यांची नाराजी दूर करण्यावर राष्ट्रवादीने भर दिला आहे.  पाटील यांनी गुरुवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

माथाडी कामगार संघटनेच्या रविवारी नवी मुंबईत झालेल्या मेळाव्यात आमदार नरेंद्र पाटील यांनी कामगारांचे प्रश्न सुटणार असल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरची भांडी घासण्याची तयारी दर्शविली. त्यावर तुमच्यावर ही वेळ येणार नाही. उलट तुमचा सन्मान केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले. आमदार पाटील यांना भाजपचे वेध लागल्याची चर्चा यातून सुरू झाली. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद पाटील यांना देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे.

आमदार नरेंद्र पाटील यांची नाराजी दूर करण्याकरिता राष्ट्रवादीकडून लगेचच प्रयत्न सुरू झाले. वसंत डावखरे यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली. डावखरे यांनीच पक्षाध्यक्ष शरद पवार गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयात आले असता उभयतांमध्ये चर्चा घडवून आणली.  पाटील यांची नाराजी दूर झाली असल्याचा दावा डावखरे यांनी केला.  पाटील यांच्या आमदारकीची मुदत जुलै २०१८ मध्ये संपत आहे. संख्याबळानुसार राष्ट्रवादीचा एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचाही समावेश असल्याने  पाटील यांना पुन्हा आमदारकी मिळण्याची शक्यता वाटत नाही. माथाडी कामगारांची मोठी संघटना जवळ येणार असल्यास पाटील यांना आमदारकी व मंडळाचे अध्यक्षपद देण्याची भाजपची तयारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 2:05 am

Web Title: annasaheb patil comment on ncp
Next Stories
1 पुनर्विकासाला नवीन बळकटी!
2 सेनेच्या दादरवर भाजपची चढाई
3 मुलांच्या अंगणी शिक्षणाची ‘नर्मदा’
Just Now!
X