आयपीएल सट्टेबाजी प्रकरणामुळे पुन्हा एकदा प्रदीप शर्मा हे नाव चर्चेत आले आहे. प्रदीप शर्मा या प्रकरणात मुख्य तपास अधिकारी आहेत. काही वर्षांपूर्वी प्रदीप शर्मा यांची मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशलिस्ट अधिकारी म्हणून ओळख होती. सध्या ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख असलेले प्रदीप शर्मा यांच्या नावाचा अंडरवर्ल्डमध्ये एक दरारा होता. मुंबईतील अंडरवर्ल्डचे गुन्हेगारी साम्राज्य मोडून काढण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली असली तरी त्यांच्या कार्यशैलीमुळे ते वादातही सापडले होते.

कधीकाळी प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या या अधिकाऱ्याचे जितके कौतुक झाले तितकाच हा अधिकारी वादातही सापडला. मुंबईवर राज्य करण्यासाठी अंडवर्ल्ड गँगमध्ये संघर्ष सुरु असताना त्यांची दादागिरी मोडून काढण्यात प्रदीप शर्मा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पण त्यांनी केलेल्या एन्काऊंटरवर संशय आणि प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झाले. एकूण ११३ एन्काऊंटरमध्ये प्रदीप शर्मा यांचा सहभाग होता.
नोव्हेंबर २००६ मध्ये राम नारायण गुप्ता ऊर्फ लखन भय्या चकमक प्रकरणामुळे ते वादात सापडले. डीएन नगर पोलीस स्टेशनचे १३ पोलीस लखन भय्या चकमक प्रकरणामुळे अडचणीत सापडले होते. त्यात प्रदीप शर्मा सुद्धा होते. २००९ ते २०१३ अशी चारवर्ष ते तुरुंगातही होते. अखेर सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. लखन भय्या अंडवर्ल्ड डॉन छोटा राजनचा विश्वासू सहकारी होता.

Delhi Lieutenant Governor V K Saxena
राज्यपालांचा एक आदेश अन् महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! माजी अध्यक्षांवर केला गंभीर आरोप
Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हेच आजच्या भारतीय लोकशाहीचे वास्तव
Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार

सध्या ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख असलेले प्रदीप शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा लहान भाऊ इक्बाल कासकरला खंडणी प्रकरणात अटक केली होती. ठाणे पोलीस दलात जबाबदारी संभाळल्यानंतर काही महिन्यातच प्रदीप शर्मा यांनी ही कारवाई केली होती. मुंबई अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडून काढणाऱ्या निवडक अधिकाऱ्यांमध्ये प्रदीप शर्मा यांचे नाव घेतले जाते. थेट दाऊदच्या भावाला आत टाकण्याची हिम्मत दाखवणारा हा अधिकारी आता आयपीएलमधल्या सट्टेबाजी प्रकरणाचा तपास करत आहेत.

शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डोंबिवलीतून सट्टेबाजी चालवणाऱ्या रॅकेटमधील चौघांना अटक केली. त्यातून कुख्यात बुकि सोनू जालानचे नाव समोर आले आणि पोलिसांचे हात अरबाज खानपर्यंत पोहोचले. त्यामुळे येत्या काळात आणखी काही बडया धेंडांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.