राज ठाकरे यांचा सवाल

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक असलेली गाडी ठेवायला कोणी सांगितले हा मूळ मुद्दा असून तो भरकटता कामा नये. त्याची केंद्राने सखोल चौकशी के ल्यास धक्कादायक नावे पुढे येऊन फटाक्यांची माळ लागेल, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी के ली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीसाठी सांगितल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी के ली.

पण या सर्व गोष्टींत मूळ तपास बाजूला राहू नये. बॉम्ब अतिरेकी ठेवतात हे ऐकले होते. पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकले नव्हते किंवा पाहिले नव्हते.

मुळात परमबीर सिंह यांना त्यांच्या पदावरून का हटवले, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केले? त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली? मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आले? असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.