06 August 2020

News Flash

हॉटेल व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

हरिप्रसाद शेट्टी (५३) यांचे चकाला परिसरात ग्रीटिंग नावाचे हॉटेल आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

व्यावसायिक भागीदारास अटक

हॉटेल व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या एमआयडीसी कक्षाने वाकोल्यातून अटक केली. हा हल्ला बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास चकाला परिसरात घडला होता.

हरिप्रसाद शेट्टी (५३) यांचे चकाला परिसरात ग्रीटिंग नावाचे हॉटेल आहे. बुधवारी रात्री जमावाने त्यांच्यावर लोखंडी शिगा, बांबूने हल्ला केला. या हल्ल्यात शेट्टी गंभीर जखमी झाले असून गोरेगाव येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या प्रकरणी समांतर तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या एमआयडीसी कक्षातील पोलीस शिपाई अमोल देशपांडे यांनी शेट्टी यांच्यावरील हल्ल्यातील प्रमुख आरोपी संतोष तळेकर (४३) याचा ठावठिकाणा शोधून काढला. कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचून तळेकर याला ताब्यात घेत  एमआयडीसी पोलिसांच्या हवाली केले.

तळेकर आणि शेट्टी यांनी भागीदारीत हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. त्यातून आर्थिक वाद उद्भवला आणि दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली. हल्ल्याच्या काही दिवस आधी तळेकर शेट्टी यांच्या हॉटेलमध्ये मित्रपरिवारासोबत जेवणासाठी आला होता. तेव्हाही दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 12:56 am

Web Title: attack assault hotel businessman akp 94
Next Stories
1 लोकमान्य टिळक टर्मिनसवर ‘प्रीपेड’ रिक्षा सेवा
2 शिक्षिकेच्या हत्येमागील हेतूबाबतचे गूढ कायम
3 बेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये दिवाळी बोनस
Just Now!
X