04 March 2021

News Flash

कोकणात पुन्हा शिवसेनेचा झंझावात आणण्यासाठी सज्ज व्हा

तुमचे प्रेम व ताकदीवर कोकणात पुन्हा शिवसेनेचा झंझावात आणण्यासाठी सर्वानी सज्ज व्हावे. कोकणाच्या मुळावर आलेल्यांना मुळासकट उखडून टाकण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुडाळच्या

| April 29, 2013 03:30 am

तुमचे प्रेम व ताकदीवर कोकणात पुन्हा शिवसेनेचा झंझावात आणण्यासाठी सर्वानी सज्ज व्हावे. कोकणाच्या मुळावर आलेल्यांना मुळासकट उखडून टाकण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुडाळच्या जाहीर सभेत केले. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीची शेलक्या शब्दांत संभावना करीत नारायण राणे यांचीही खिल्ली उडविली.
कुडाळ येथे झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या मुळावर आलेल्या असुरांनी जमिनी बळकाविल्या आहेत. उपरे, घरातील सर्व असुरांना राजकारणातून उखडून टाकण्यासाठी शिवसेनेचा नव्या दमाने कोकणात झंझावात आणूया, असे आवाहन केले. शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्गच्या सभेत नतमस्तक झाले होते, त्याची आठवण काढत तेही या सभेसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांना गदा भेट देण्यात आली. त्याचा आधार घेत ठाकरे म्हणाले, ही गदा ढेकणांना मारण्यासाठी उपयोगी पडणार नाही, ढेकणांना पायाने गाडूया, असे आवाहन करत तुमचे प्रेम व ताकद हीच शिवसेनेच्या भगव्याची डौलदार ताकद आहे, असे ते म्हणाले.
कोकणाने ही भगव्याची लाट लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दाखवून कोकण व शिवसेनेचे नाते किती घट्ट आहे हे त्यांना दाखवा, असे आवाहन करून तुमचे प्रेम व ताकदीवरच हे शिवधनुष्य उचलले आहे.
शिवाजी महाराज, मच्छिंद्रनाथांनी कोकणात वाढलेल्या असुरांना नष्ट केले, त्यामुळे आता माजलेल्या असुरांना नष्ट करूया, असे आवाहन करीत अंगावर वस्त्र नसणाऱ्यांचे वस्त्रहरण काय करणार, असा टोला त्यांनी हाणला.
आम्ही बोलतोय व तुम्ही भोगताय, अशी अवस्था तुमची करून ठेवली आहे, असे सांगत अन्यायाविरोधात पेटून उठा, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असे त्यांनी सांगितले. राणेच्या वस्त्रहरणासाठी ही सभा नव्हे, ती क्षुल्लक बाब आहे.
सर्वच गद्दारांना अस्सल शिवसैनिक गाडणार आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगून, नसते उद्योगमंत्री आहेत, त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, पण लोकांना विमानतळ, बंदर अशी विकासाची स्वप्ने दाखवून लुबाडणूक केली जात आहे. गोरगरिबांच्या कल्याणासाठी राजकारण आम्ही करत आहोत. त्यामुळे राजकारण चुलीत गेले तरी चालेल, पण कोकणच्या जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 3:30 am

Web Title: be ready to bring thunderstorm of shivsena again in konkan
टॅग : Konkan,Politics
Next Stories
1 एमएमआरडीए लढतीत राष्ट्रवादीत मतफुटी
2 अशोक चव्हाणांच्या पुनर्वसनाची काँग्रेसला घाई
3 सहाय्यक पोलीस निरीक्षकाची दुसऱ्या पत्नीकडून हत्या
Just Now!
X