News Flash

अश्लील चित्रफितींच्या प्रसारणातून कोट्यवधींची कमाई

टाळेबंदीच्या कालावधीत या तीन तरुणांनी १७ यू ट्यूब वाहिन्या तयात केल्या. त्यावर सुमारे ३०० अश्लील ध्वनिचित्रफिती प्रसारित केल्या.

शिक्षकासह तिघांना अटक

मुंबई : तरुणींच्या अश्लील चित्रफिती तयार करून त्या यू ट्यूब वाहिन्या, फेसबूकसह अन्य समाजमाध्यमांवर प्रसारित करून टाळेबंदीच्या काळात कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या तीन तरुणांना सायबर पोलिसांनी अटक केली. यापैकी एक तरुण २००८ मध्ये ठाणे जिल्ह्यातून दहावीत पहिला आला होता. सध्या तो शिक्षक आहे.

टाळेबंदीच्या कालावधीत या तीन तरुणांनी १७ यू ट्यूब वाहिन्या तयात केल्या. त्यावर सुमारे ३०० अश्लील ध्वनिचित्रफिती प्रसारित केल्या. त्या सुमारे १५ कोटी व्यक्तींनी पाहिल्या. अधिकाधिक दर्शकसंख्या लाभलेल्या वाहिन्यांना यू ट्यूब, फेसबूक मानधन देते. या आरोपींनी हे मानधन तर घेतलेच, शिवाय या चित्रफितींआधारे दर्शकसंख्या वाढवून जाहिरातीही गोळा केल्या. टाळेबंदीत या तिघांनी सुमारे दोन कोटी रुपये या माध्यमातून कमावले, अशी माहिती सायबर विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली. आरोपींनी प्रसारित केलेल्या ३००  ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवरून हटविण्यात आल्या आहेत.

या तीन आरोपींप्रमाणे अश्लील ध्वनिचित्रफिती प्रसारित करणाऱ्या, त्या आधारे अर्थार्जन करणाऱ्या अनेक व्यक्ती, टोळ्या असून त्यांची माहिती मिळवली जात आहे, असे करंदीकर यांनी स्पष्ट केले. या तऱ्हेने महिला, तरुणींची पिळवणूक सुरू असल्याबाबत राज्य महिला आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या. आयोगाने त्या तपासासाठी सायबर पोलीस ठाण्याकडे पाठविल्या होत्या.

विनोदी चित्रफितीच्या बहाण्याने…

या प्रकरणातील प्रमुख आरोपी खासगी शिकवणीत शिकवतो. त्याने स्वत:च्याच विद्यार्थिनींच्या अश्लील ध्वनिचित्रफिती बळजबरी तयार करून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हा आरोपी खट्याळ, गमतीदार चित्रफिती चित्रित करण्याच्या बहाण्याने, आर्थिक लाभाचे प्रलोभन दाखवत तरुणींना निर्जन ठिकाणी नेत असे. तेथे भलतेच प्रकार करण्यास भाग पाडे. तरुणींनी विरोध केल्यास चित्रीकरणाचा खर्च भरावा लागेल, अशी धमकी देत असे. या प्रकाराला काही महिलाही बळी पडल्या आहेत.

आत्महत्येच्या धमकीनंतरही प्रसारण

बदनामी होईल, लग्न मोडेल, आयुष्य उद्ध्वस्त होईल… अशा विनंत्यांनाही आरोपीने थारा दिला नाही. यापैकी एका तरुणीने चित्रफीत न हटविल्यास आत्महत्या करण्याची धमकी आरोपीला दिली होती. आरोपीने त्या तरुणीची चित्रफीत एका यू-ट्यूब वाहिनीवरून हटवली. मात्र दुसऱ्या वाहिनीवर प्रसारित केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 2:53 am

Web Title: billions of rupees earned from broadcasting dirty obscene videos alkp 94
Next Stories
1 राज्यात ‘कृषी ऊर्जा पर्व’
2 भाजपचे आंदोलन
3 राज्यात आठ नवीन ‘कॅथलॅब’ केंद्रे
Just Now!
X