23 January 2021

News Flash

‘प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंधश्रद्धा’, शहीद करकरेंच्या वेशात आमदाराचा विधानभवनात प्रवेश

भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे वेषांतर केलं होतं

सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विरोधक वेगवेगळ्या प्रकारे आंदोनल करत राज्य सरकारचा निषेध करत आहेत. कधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून तर कधी हातात वेगवेगळे फलक घेऊन विरोधक सरकारप्रती आपला रोष व्यक्त करताना दिसतात. पण नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या वेशात विधानभवनात प्रवेश करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे वेषांतर केलं होतं. विधानभवनाच्या गेटजवळ पोलिसांनी गजभिये यांना अडवण्याचा प्रयत्नही केला.

यावेळी प्रकाश गजभिये यांनी हातात एक फलक घेतला होता. यावर लिहिण्यात आलं होतं की, ‘प्रज्ञाच्या शापाने मरण पावलेलो ही अंधश्रद्धा आहे, मी देशासाठी शहीद झालो’. प्रज्ञा ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

‘हेमंत करकरेंनी मला खूप त्रास दिला होता, म्हणून मी त्यांना शाप दिला होता. त्यामुळेच त्यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला’, असं वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा ठाकूर यांनी केलं होतं. याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रकाश गजभिये हे हेमंत करकरे यांच्या वेशात आले होते.

प्रकाश गजभिये नेहमीच वेगवेगळ्या वेशात येऊन आपला निषेध व्यक्त करत असतात. मागील अधिवेशनात त्यांनी शिवाजी महाराजांच्या पोशाखात प्रवेश केला होता. तर एकदा संभाजी भिडे यांच्या आंबा खाल्ल्याने मुलं होतात या विधानाचा निषेध करण्यासाठी त्यांच्या वेशात विधानभवनात प्रवेश कला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 2:05 pm

Web Title: bjp mp pradnya thakur ncp mla prakash gajbhiye martyr hemant karkare monsoon session sgy 87
Next Stories
1 योगायोगानं लागला पाच महिन्यापूर्वीच्या खुनाचा छडा
2  ‘वर्षां’ बंगल्याचा मालमत्ता करही पाच वर्षांपासून थकीत
3 पार्किंग धोरणाचा पालिकेला विसर
Just Now!
X