News Flash

#CAA: भाजपाकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर

शिक्षणाची दारं व्यवस्थेनं बंद केली होती, त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या आलिकडच्या पिढीकडे कुठलीही कागदपत्रे नाहीत. एनआरसी या लोकांविरोधात असणार आहे.

#CAA: भाजपाकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर,

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) विरोधात वंचित बहुजन आघाडीने दादरमध्ये गुरुवारी धरणे आंदोलन केलं. यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित केले. “भाजपाकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरु आहे” असा आरोप त्यांनी यावेळी केला.

आंबेडकर म्हणाले, “सरकारने आणलेली डिटेन्शन कँपची जी पद्धत आहे, ती ब्रिटिशांनी आणलेली पद्धत आहे. त्यावेळी त्यांनी जो गुन्हेगारी जमात कायदा केला यामध्ये ज्या जमातींना गुन्हेगार ठरवलं गेलं, त्या जमातींना डिटेन्शन कँपमध्ये ठेवण्यातं आलं होतं. या देशात ज्यांना शिक्षणाची दारं व्यवस्थेनं बंद केली होती, त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या आलिकडच्या पिढीकडे कुठलीही कागदपत्रे नाहीत. एनआरसी या लोकांविरोधात असणार आहे. जर तुम्हाला या डिटेन्शन कँपमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा” असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं.

नागरिकत्व कायदा हा केवळ मुस्लिम विरोधी नाही तर ४० टक्के हिंदूच्याही विरोधातील आहे, असा आरोपही यावेळी आंबेडकर यांनी केला. यासाठी त्यांनी केंद्र सरकारच्या आडून थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच हल्लाबोल केला. “संघाला आपलं राज्य कायम ठेवायचं असून विरोधकांना संपवायचं आहे. त्यामुळेच विचारपूर्वक केलेल्या या कायद्याला संघर्षपूर्ण उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला डिटेन्शन कँपमध्ये जायचं नसेल तर या सरकारविरोधात आवाज उठवायला पाहिजे,” असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर बोलताना आंबेडकर म्हणाले, “भाजपाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा बट्याबोळ केला. २८ फेब्रुवारी २०२० रोजी या देशाला चालवण्यासाठी कमीत कमी जो निधी लागतो तो सरकार तिजोरीत जमा आहे का? हे सरकारनं सांगावं. याबाबत देशाच्या अर्थव्यवस्थेचा अर्थतज्ज्ञांनी खुलासा करावा” असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2019 2:40 pm

Web Title: bjp trying to create chaos in the country says prakash ambedkar aau 85
Next Stories
1 मुंबई : ‘सीएए’विरोधात वंचित बहुजन आघाडीचं धरणं आंदोलन
2 मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, गाडी कटरच्या सहाय्याने कापून चालकाचा मृतदेह काढला बाहेर
3 सेना शाखाप्रमुखावर गुन्हा
Just Now!
X