अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेट झोनचा बोर्ड मुंबई महापालिकेने आज उतरवला आहे. अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याच्या परिसरातल्या एका सुरक्षा रक्षकाला करोनाची लागण झाली होती. ज्यामुळे रेखा यांचा बंगला सील करण्यात आला होता. तसंच त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोनची बोर्डही लावण्यात आला होता. जो आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. ११ जुलै रोजी हा बंगला सील करण्यात आला होता. आता या बंगल्यावरची कंटेन्मेंट झोनची पाटी उतरवण्यात आली आहे.

अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण झाल्याची माहिती ११ जुलै रोजी समोर आली होती. त्यानंतर महानगरपालिकेने रेखा यांचा बंगला सील केला. त्याचसोबत बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोन असा फलकही लावण्यात आला होता. जो फलक आज उतरवण्यात आला आहे. वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे. बंगल्यात दोन सुरक्षारक्षक असतात. त्यापैकी एकाला करोनाची लागण झाली. संबंधित सुरक्षारक्षकावर उपचार सुरू करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसर सॅनिटाइझही केला. आता कंटेन्मेंट झोनचा हा फलक उतरवण्यात आला आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.