05 March 2021

News Flash

… तर पुढील १० दिवसांत कठोर निर्णय घेऊ; मुंबईकरांना महापालिकेचा इशारा

महापालिका मुंबईतील करोना स्थितीचा आढावा घेणार

संग्रहित

मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागाला चिंता सतावत आहे. मुंबईबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची वाढलेली संख्या आणि प्रतिबंधात्मक नियम धुडकावून शहरात ठिकठिकाणी होणारी गर्दी यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तर पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्याचा सूचक इशाराही दिला आहे. दरम्यान महापालिका मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

…अन्यथा मुंबईत पुन्हा लॉकडाउन करावा लागेल; महापौरांचा इशारा

“महापालिका मुंबईतील करोना स्थितीचा आढावा घेणार आहे. जर करोना रुग्ण वाढत राहिले आणि लोकांनी करोनासंबंधीत नियमांचं उल्लंघन केलं तर महापालिका पुढील १० दिवसांत कठोर निर्णय घेताना अजिबात मागे पुढे पाहणार नाही,” असा इशारा सुरेश काकाणी यांनी दिला आहे.

मुंबईत दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ४०० होती. फेब्रुवारीपासून यात पुन्हा वाढ झाल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या पुन्हा पाचशेपर्यंत पोहोचली आहे. गेल्या आठवडय़ापेक्षा या आठवडय़ात निश्चितच रुग्णांची संख्या चारशे ते पाचशेने वाढली आहे.

“परदेशातून आणि इतर जिल्ह्य़ांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. नियमित विभागवार केलेल्या चाचण्या बंद झाल्या आहेत. आत्ता झोपडपट्टीतील रुग्णसंख्या कमीच असून आता आढळलेले रुग्ण हे गृहनिर्माण संकुलातील आहेत. त्यातही अधिक रुग्णांचे निदान हे विमानतळ, रेल्वे स्थानके आणि पालिकेच्या रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागांमध्ये केलं जातं. त्यात प्रतिबंधात्मक नियमांचे पालनही योग्य रीतीने केलं जात नसल्याचं,” सुरेश काकाणी यांनी याआधी सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 11:14 am

Web Title: bmc will not hesitate in taking a strong measure within the next 10 days says suresh kakani sgy 87
Next Stories
1 पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग नवव्या दिवशी वाढ; जाणून घ्या सध्याचे दर
2 मुख्यमंत्र्यांचे आमदारांसाठी स्नेहभोजन
3 मुंबईत पुन्हा रुग्णवाढ
Just Now!
X