News Flash

दीपिका पदुकोणची आज ‘एनसीबी’कडून होणार चौकशी

दीपिकासोबत सारा अली खान आणि श्रद्धा कपूरचीही होणार चौकशी

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) चौकशी करणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिका पदुकोणसह बॉलिवूडमधील काही दिग्गज अभिनेत्रींची नावंदेखील उघड झाली आहेत. त्यामुळेच एनसीबीने बुधवारी दीपिका पदुकोण, रकुल प्रीत, श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार, आज दीपिकाची चौकशी होणार आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. त्यानंतर दीपिका तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर सोडून चौकशीसाठी मुंबईत दाखल झाली आहे. तसंच आपण एनसीबीला तपासात सहकार्य करणार असल्याचं दीपिका पदुकोणने अलिकडेच म्हटलं आहे. त्यामुळे आज शनिवारी (२६ सप्टेंबर) दीपिकाची चौकशी होणार आहे. तसंच दीपिकासोबत सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीदेखील चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रकुल प्रीत सिंह आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची एनसीबीने चौकशी केली.

दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान सारा, रकुल यांचा उल्लेख केला होता. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली, तर बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारकांशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर एनसीबीने दीपिकाला समन्स जारी केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 8:18 am

Web Title: bollywood drug probe deepika padukone face ncb questioning today ssj 93
Next Stories
1 लघुउद्योगाला मरगळ
2 जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात विकासकांना मोकळे रान?
3 महिला प्रवाशांचा लोकल प्रवास तापदायक
Just Now!
X