News Flash

गँगस्टर, बुकी पप्पू सावलाला मुंबई पोलिसांनी केले तडीपार

खंडणीखोर आणि बुकी पप्पू उर्फ सावला या सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे.

विविध पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल असलेला खंडणीखोर आणि बुकी पप्पू सावला या सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. उद्यापासून या तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पप्पू उर्फ प्रकाश सावला हा सराईत खंडणीखोर आणि बुकी असून मुंबईच्या मिरारोड, पालघर, बोरीवली आणि अन्य पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त युनिट-११ संग्राम सिंह यांनी पप्पू उर्फ सावला याला मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे.

तडीपारी दरम्यान पप्पू उर्फ सावला दोन जिल्ह्याच्या हद्दीत आढळल्यास पुन्हा तडीपारीची मर्यादा वाढविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2019 9:16 pm

Web Title: bookie gangster and extortionist pappu savla has been externed from mumba
Next Stories
1 प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
2 आता पाण्यातही ‘उबर’, मुंबई ते आलिबाग करा जलद प्रवास
3 राज ठाकरेंना आघाडीत घेण्याबाबत सध्या कुठलीही चर्चा नाही : नवाब मलिक
Just Now!
X