News Flash

भायखळा तुरुंग हत्याप्रकरण-‘मंजुळा शेट्येच्या गुप्तांगावर जखमा नाहीत’

मंजुळा शेट्येचा २४ जूनला भायखळा तुरुंगात मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले असा आरोप शीना बोरा हत्याकांडातली प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी

मंजुळा शेट्येच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे, तिच्या गुप्तांगावर कोणत्याही जखमा नाहीत असे तुरूंग प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे मंजुळावर लैंगिक अत्याचार झाले आहेत की नाही? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे. दरम्यान या प्रकरणातले सगळे सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिल्लीत दिली आहे. या प्रकरणातल्या दोषी तुरूंग अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन आजच गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले होते. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी, शीना बोरा हत्याकांडातली प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने मंजुळावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. मात्र मंजुळाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये तिच्या गुप्तागांवर कोणत्याही जखमा असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. हा अहवाल आज तुरुंग प्रशासनातर्फे आज कोर्टात सादर करण्यात आला. इंद्राणी मुखर्जीने, मंजुळावर निर्भयासारखेच अत्याचार केले जात असल्याचा आरोप केला होता. तसेच भायखळा जेलमध्ये झालेल्या या घटनेनंतर महिला कैद्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी महिलांना मारहाण करण्यासाठी पोलीसही लाठ्या घेऊन आले होते, असाही आरोप इंद्राणीने केला होता. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोगानेही घेतली आहे. याबाबत महिला आयोगाने सुमोटो समिती स्थापन केली आहे. जेल अधीक्षकांनी शवविच्छेदन अहवाल घेऊन हजर राहावे असेही म्हटले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा २४ जून २०१७ रोजी भायखळा तुरूंगात मृत्यू झाला. हा मृत्यू तुरूंग अधिकाऱ्यांच्या मारहाणीत झाल्याची माहिती समोर

मंजुळा शेट्येच्या मृत्यूपूर्वी तिला नग्न करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचाही आरोप

मंजुळाकडून दोन अंडी पाच पाव याचा हिशेब लागत नव्हता म्हणून ही अमानुष मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये तिला निर्वस्त्र करून मारण्यात आले असा आरोप इंद्राणी मुखर्जीने केला आहे

इंद्राणी मुखर्जी आणि इतर महिला कैद्यांनी मंजुळावर तुरूंग अधिकाऱ्यांनी अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

या सगळ्या प्रकरणानंतर नागपाडा पोलिसांनी इतर महिला कैद्यांना बोलते केले, त्यांनी हा अत्याचार घडल्याची माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 5:20 pm

Web Title: byculla jail riot maharashtra cm says truth will come out soon
टॅग : Loksatta,Marathi News,News
Next Stories
1 सीएसटी स्थानकाच्या नावात बदल; मध्य रेल्वेकडून अधिसूचना जारी
2 ‘…तर भायखळा जेलमधील मंजुळा शेट्येचा जीव वाचला असता!’
3 मरिन ड्राइव्हवरील ‘सेल्फी’ तरुणीच्या जिवावर
Just Now!
X