तराफा अपघात;  मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी

मुंबई : पी ३०५ या तराफ्याच्या अपघातास जबाबदार ठरवण्यात आलेले कप्तान राकेश बल्लव पोलीस नोंदीनुसार अद्यापही बेपत्ता आहेत. जेजे रुग्णालयाच्या शवागारातील एक मृतदेह बल्लव यांच्याशी मिळताजुळता असल्याचा अंदाज कु टुंबाने वर्तविला असला तरी पोलिसांनी डीएनए चाचणीद्वारे खातरजमा करण्याचा निर्णय घेतला. चाचणीसाठी बल्लव यांच्या मुलाचा नमुना न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाटण्याहून मुंबईत आलेल्या बल्लव कु टुंबाने जेजे रुग्णालयातील २६ मृतदेह पाहिले. त्यापैकी एक मृतदेह बल्लव यांचा असावा, असा अंदाज व्यक्त के ला. मात्र अंदाजावर मृतदेह ताब्यात देण्यास पोलिसांनी नकार दिला. डीएनए चाचणीतून खातरजमा करून मृतदेह ताब्यात देऊ, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. बल्लव यांच्या मुलाचा डीएनए २६ मृतदेहांच्या नमुन्याशी जुळवून पाहिला जाईल. डीएनए जुळल्यास बल्लव यांचा या अपघातात मृत्यू झाला हे स्पष्ट होईल, असे तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

तौक्ते चक्रीवादळात पी ३०५ तराफ्यास जलसमाधी मिळाली. वाचलेल्यांपैकी तराफ्याचे मुख्य अभियंता रेहमान शेख यांनी अपघातास बल्लव जबाबदार असल्याचा जबाब दिला. चक्रीवादळ आणि त्याच्या परिणामांबाबतची पूर्वसूचना तराफा, मालक कं पनी आणि कप्तान बल्लव यांना मिळाली होती. मात्र वादळ फार काळ टिकणार नाही, वारे वेगाने वाहणार नाहीत, असा विश्वास बल्लव यांना होता. मालक  कंपनीनेही बल्लव यांना तराफा अन्यत्र हलवू नये, अशी सूचना दिली होती. प्रत्यक्षात बल्लव आणि कं पनीचा अंदाज चुकला.

मदतकार्य, शोधमोहिमेत नौदलाच्या हाती ७१ मृतदेह लागले. तर आठ मृतदेह रायगडच्या किनाऱ्यावर वाहून आले. ७१पैकी ५३ मृतदेहांची ओळख पटली असून ते कु टुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, या अपघातातून वाचलेल्या अधिकारी, कामगारांचे जबाब येलो गेट पोलिसांनी नोंदवण्यास सुरुवात के ली आहे. या अपघातास बल्लव यांच्यासह अन्य कोण जबाबदार आहे याचा तपास पोलीस करत आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मागणी संबंधित कं पन्यांकडे के ली आहे, असे येलोगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुहास हेमाडे यांनी सांगितले.