26 February 2021

News Flash

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिट उशिराने धावत आहेत.

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिट उशिराने धावत आहेत. कुर्ला-मुलुंड दरम्यान स्लो ट्रॅकवरची वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे. नेमका काय बिघाड झालाय त्याची अधिकृत माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली नाही.

कांजूरमार्ग जवळ एक लोकल बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. कल्याण आणि मुंबई दोन्ही दिशेच्या रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या ऐन कामावर जाण्याच्यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 7:10 am

Web Title: central railway disturp
Next Stories
1 पटेलांचा पुतळा उंच ठरावा म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे विकृत मनाचे लक्षण – उद्धव ठाकरे
2 दुधात भेसळ केल्यास जन्मठेप
3 तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोधकांचे खतपाणी!
Just Now!
X