मध्य रेल्वेवर दिवा स्थानकाजवळ मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे वृत्त आहे. या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिराने सुरू आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा खोळंबा झाल्याने प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्तापाचा सामना करावा लागला.

मध्य रेल्वेचे रडगाणे शुक्रवारी देखील सुरूच होते. दिवा- मुंब्रा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला असून यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावर लोकल गाड्या खोळंबल्या. पारसिक बोगद्यापर्यंत लोकल गाड्यांच्या रांगा लागल्या असून ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.

दरम्यान, मध्य रेल्वेवर चार दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वेळापत्रक कोलमडले आहे. मंगळवारी देखील मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या कारभारावर टीका होत आहे.