News Flash

मुख्यमंत्री आज पंतप्रधानांच्या भेटीला

शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षां निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिष्टमंडळासह मंगळवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व मुख्य सचिव सीताराम कुंटे हे पंतप्रधानांची भेट घेतील. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, तौक्ते  वादळग्रस्तांना नुकसानभरपाई, जीएसटी भरपाईची थकबाकी या विषयांवर ते पंतप्रधानांशी चर्चा करतील, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षां निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण व इतर विषयांबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

मा मुख्यमंत्री महोदय यांचे मंगळवार 8 जून 2021 रोजीचे कार्यक्रम

सकाळी 7 वाजता: विमानाने दिल्लीकडे प्रयाण

सकाळी 9.45 वाजता महाराष्ट्र सदन येथे आगमन

सकाळी 11 वाजता : मा पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत बैठक
स्थळ: प्रधानमंत्री निवास, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली

बैठकीनंतर सोयीनुसार मुंबईकडे विमानाने प्रयाण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 4:34 am

Web Title: chief minister uddhav thackeray to meet prime minister narendra modi today zws 70
Next Stories
1 Heavy rains alert in Mumbai : मुंबईला अतिवृष्टीचा धोका
2 आता ‘कस्तुरबा’मध्येही जनुकीय क्रमनिर्धारण 
3 शाळा-महाविद्यालये-धार्मिक स्थळे बंदच
Just Now!
X