26 September 2020

News Flash

मराठा आरक्षणाबाबत आज ठाकरे-फडणवीस यांच्यात चर्चा

फडणवीस गेले चार-पाच दिवस बिहार दौऱ्यावर असल्याने ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरूनही संभाषण केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मराठा आरक्षणप्रश्नी बुधवारी रात्री साडेआठ वाजता चर्चा होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवडय़ात स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. मराठा समाजातील नाराजी वाढत असून अकरावी, पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी अध्यादेश काढण्यासह वेगवेगळे पर्याय पुढे आले आहेत.

त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे हे फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. फडणवीस गेले चार-पाच दिवस बिहार दौऱ्यावर असल्याने ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरूनही संभाषण केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:14 am

Web Title: cm uddhav thackeray and devendra fadnavis discuss maratha reservation issue abn 97
Next Stories
1 ‘वाढीव वीज देयकांची फेरतपासणी करा’
2 काँग्रेसचे आज राज्यभर आंदोलन
3 राज्यसेवेच्या विद्यार्थाना अशक्यतावादाची ‘बाधा’
Just Now!
X