मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतल्या बार आणि रेस्टॉरंट्समधून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मोठा गदारोळ सुरू झालेला असतानाच आता या पत्राच्या सत्यतेची खातरजमा मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला मिळालेल्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

“गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं”, परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप!

‘गृहरक्षक दलाचे कमांडंट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी ४.३७ वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल अ‍ॅड्रेसवरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेल्या आणि स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल अ‍ॅड्रेस तपासून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे’, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Parambir Singh Letter : गृहमंत्र्यांवरील आरोपांच्या पुराव्यादाखल परमबीर सिंग यांनी पत्रात दिले एसीपींचे ‘हे’ मेसेज!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल अ‍ॅड्रेस parimbirs@hotmail.com असा आहे. त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे’, असे देखील मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Parambir Singh Letter : “मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्र्यांनी दबाव टाकला”, परमबीर सिंग यांचा आरोप!