16 February 2019

News Flash

‘नालायकांचे सोबती’ अग्रलेखावर व्यक्त होण्याची संधी

सरकारवरील टीकेची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर बोचऱ्या शब्दांत टीका करणाऱ्या ‘लोकसत्ता’मधील ‘नालायकांचे सोबती’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

सत्तेत भारतीय जनता पक्षासोबत भागीदारी करतानाच सरकारवरील टीकेची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. मात्र, ज्या सरकारला ते आपल्या भाषणांमधून नालायक ठरवितात त्याच सरकारमध्ये आपलेही मावळे आहेत, हे ते विसरतात. ११ एप्रिलला प्रकाशित झालेल्या या अग्रलेखात नेमक्या या विरोधाभासावर बोट ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या अग्रलेखावर आपली भूमिका मांडायची आहे. पुढच्या गुरुवापर्यंत आपले मत नोंदविता येईल. www.loksatta.com/Blogben या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.

First Published on April 19, 2016 1:59 am

Web Title: comment loksatta agralekh through loksatta blog benchers