मुंबई : महानगरपालिकेच्या विविध रुग्णालये आणि आरोग्य केंद्रामध्ये प्राणवायू निर्मिती यंत्रणा उभारणी व देखभालीसाठी बाजारभावापेक्षा अधिक दर मंजूर करण्यात येत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.  गलगली यांनी म्हटले आहे की, ८५० लिटर क्षमतेच्या प्राणवायू निर्मिती यंत्रांची ६५ लाख रुपये इतकी बाजारभावाने किंमत आहे. वाढीव क्षमतेचे यंत्र घेतल्यास काही प्रमाणात किंमत वाढते. पालिकेने ८६ कोटी ४२ कोटी रुपये इतक्या रकमेचे अंदाजपत्रक तयार केले. निविदा प्रक्रियेत मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने ९२ कोटी ८५ लाख रुपयांची निविदा भरली व वाटाघाटीत नऊ कोटी सवलत दिल्याचे दाखवीत अखेर हे काम ८३ कोटी ८३ लाख रुपयांना देण्यात येत आहे.