माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खडे बोल
सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा राज्यात अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटले दाखल करून त्यांना न्यायालयांमध्ये खेटे घालण्यास भाग पाडले जाते. भाजप सरकारमधील विनोद तावडे, पंकजा मुंडे किंवा गिरीश बापट यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप झाले असताना न्यायालयात खटले दाखल केले असते तरी त्यांच्या वाभाडे निघाले असते, पण काँग्रेसने ही संधी गमाविली, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केली.
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अशोक चव्हाण यांच्या विरोधात राज्यपालांनी खटला दाखल करण्यास दिलेल्या परवानगीवर चर्चा झाली. सुडबुद्धीने वागणाऱ्या भाजपचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. अशोक चव्हाण, छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांच्या विरोधात राजकीय हेतून प्रेरित कारवाई केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

शिवसेनेचे मंत्री बैठकीला चहा-भज्यांसाठी जातात का?
पंढरपूर : राज्यातील तूरडाळीच्या साठेबाजांवर र्निबध उठवण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट आणि मुख्यमंत्री यांनी घेतला. मात्र या बाबत शिवसेनेला विचाले असता ‘काही माहीत नाही’ असे सांगतात. मग मंत्रिमंडळाच्या बठकीला केवळ चहा-भजी खाण्यासाठी जाता का, असा खोचक सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे एका कार्यक्रमात उपस्थित केला.