भाजपा शिष्टमंडळांने आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेत अश्लील पद्धतीने ट्रोलिंग व सोशल मीडियावर गैरसमज पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर बदनामी कारक पोस्ट टाकून देवेंद्र फडणवीस, भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. दरम्यान काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सांवत यांनी भाजपाला टोला लगावत ट्रोल्सच्या जनकांना आज ट्रोलविरोधात तक्रार करण्याची वेळ येणे हा नियतीचा खेळ असल्याचं म्हटलं आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “ट्रोल्सच्या जनकांना आज ट्रोलविरोधात तक्रार करण्याची वेळ येणे हा नियतीचा खेळ आहे. बोया पेड बबूल का, आम कहांसे खाय? २०१४ नंतर देशात ट्रोलधाड भाजपाने आणली. आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. अजून धर्मांधता भाजपा ट्रोल्स पसरवतात. तरीही शिवीगाळ,धमक्या असतील तर पोलिसांनी कारवाई करावी”.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मंगलप्रभात लोढा परमबीर सिंह यांच्या भेटीला पोहोचले होते. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “राज्यपालांच्या टोपीवर वक्तव्य केल्यानंतरही जर गुन्हा दाखल होत नसेल तर हे गंभीर असून पोलीस दुजाभाव करत असल्याचा आमचा आरोप आहे. आक्षेपार्ह पोस्ट नसतानाही आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले जात असून हे सरकार सुडाचं राजकारण करतंय का अशी शंका निर्माण होत आहे”.

“काही ठिकाणी अश्लील पोस्ट टाकल्यानंतर त्याला दम देणं अपेक्षित आहे का ? भाजपाची सहनशीलता दुर्बलता समजू नये. अन्यथा आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील हेही आम्ही नम्रपणे सांगितलं,” असल्याचं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.