सुरक्षा उपायांविनाच छाटणी; कापलेल्या फांद्या न उचलल्याने रस्ता चिंचोळा

मुंबई : वाहनांच्या रहदारीतील अडथळय़ांमध्ये महापालिके ने खासगी कंत्राटदारांकरवी शहरात सुरू केलेल्या वृक्षछाटणीची भर पडली आहे. कंत्राटी कामगार छाटलेल्या मोठमोठय़ा फांद्या रस्त्यावर तशाच सोडून दिल्याने जागोजागी रस्ता चिंचोळा होतो आणि वाहतूक कोंडी होते. विशेष म्हणजे खासगी कं त्राटदारांकडून छाटणी करताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना के ली जात नसल्याने मोठा अपघात होण्याचीही शक्यता आहे.

गेल्या आठवडय़ापासून विद्यापीठासमोरील मार्ग(कलिना), वाकोला भागातील वृक्षछाटणी खासगी कं त्राटदाराकरवी सुरू आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हे कामगार वाहतूक रोखतात आणि विजेवर चालणाऱ्या करवतीने फांद्या छाटतात. उंचावरून पडणाऱ्या फांद्या सुरक्षितपणे जमिनीवर उतरवण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही साधन उपलब्ध नाही किं वा तशी काळजी घेतली जात नाही. रविवारी विद्यापीठाजवळच मोठय़ा वृक्षाची छाटलेली फांदी थेट रस्त्यावर कोसळली. मात्र फांदी दोन ते तीन के बलना (वाहिन्या) अडकू न खाली आली. त्यामुळे या के बलही रस्त्यावर आल्या आणि पथदिव्यांचे खांबही वाकले. फांदीने रस्ता अडविल्याने ती बाजूला के ल्याशिवाय मोठी वाहने पुढे सरकू  शकत नव्हती. त्यातही ती बाजूला करण्यात आणखी दहा मिनिटे वाया गेली. त्यामुळे कपाडिया नगपर्यंत वाहतूक तुंबली. त्याचा फटका वांद्रे-कु र्ला संकु लात जाणाऱ्या वाहनांनाही बसला.

बुधवारी छाटणीचे काम वाकोला चौकाजवळ सुरू होते. मात्र गेल्या आठवडय़ात तोडलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच पडून होत्या. वाकोला चौकाजवळही मोठय़ा प्रमाणात फांद्या रस्त्यावर ठेवण्यात आल्या होत्या. हेच चित्र जिजाबाई भोसले मार्ग तथा घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरही दिसले. विद्यापीठासमोरील रस्त्यावर सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याचा विस्तार गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. कपाडिया नगर येथून वाकोला चौकापर्यंत उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. त्यामुळे हा मार्ग आधीच अरुंद आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हा रस्ता आणखी चिंचोळा होतो. त्यामुळे शहराचा पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या प्रमुख आणि अत्यंत रहदारीच्या मार्गावर कायम वाहतूक कोंडी होते. त्यातच वृक्षछाटणीचा अडथळा सुरू झाल्याने वाहनचालक, प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागतो.