रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी : बाजारपेठा, उपाहारगृहे, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत बंद; वृत्तपत्र वितरणास मुभा

मुंबई  : करोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपाहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने रविवारी घेतला. शनिवार आणि रविवारी संचारबंदी, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी, असे विविध निर्बंध लागू करीत राज्य सरकारने राज्यात अंशत: टाळेबंदीच लागू के ली. मात्र, रेल्वे व रस्ते वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसून, वृत्तपत्र वितरणासही मुभा  देण्यात आली आहे.

राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टाळेबंदी की कठोर निर्बंध यावर बरेच दिवस खल सुरू होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करीत त्यांची मते जाणून घेतली होती. रविवारी दुपारी झालेल्या तातडीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षांचा अनुभव लक्षात घेता टाळेबंदी लागू करण्यात आलेली नसली तरी सरकारने लागू केलेले कठोर निर्बंध पाहता टाळेबंदीची दुसरी आवृत्तीच मानली जाते. हे सारे निर्बंध ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लागू के लेल्या मार्गदर्शक तत्वात स्पष्ट के ले आहे. हे सारे निर्बंध सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून अमलात येतील.

 

संचारबंदी आणि जमावबंदी

रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी लागू असेल. या काळात पाच किं वा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात उर्वरित तीन शनिवार व रविवार असे दोन दिवस संपूर्ण संचारबंदी लागू असेल. हे निर्बंध शुक्र वारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत लागू असतील. संचारबंदीच्या काळात सबळ कारण अथवा प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणालाही बाहेर फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवा, आरोग्य, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे, वस्तूंची वाहतूक करणारे, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, ई-कॉमर्स, शेतीशी संबंधित कामे, पालिके शी संबंधित कर्मचारी यांना या र्निबधातून वगळण्यात आले आहे.

 

मनोरंजन क्षेत्रे, व्यायामशाळा बंद

चित्रपटगृहे, नाटय़गृहे, मनोरंजन केंद्रे, वॉटरपार्क , क्लब, तरण तलाव, व्यायामशाळा , क्रीडा संकु ले ३० तारखेपर्यंत बंद ठेवली जातील. चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला काही अटींवर परवावनगी दिली जाईल.

 

उपाहारगृहे, बार बंद

सर्व प्रकारची उपाहारगृहे व बार बंद राहतील. राहण्याची व्यवस्था असलेल्या हॉटेल्समधील उपाहारगृहे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत घरपोच खाद्यपदार्थ देता येतील. घरपोच खाद्यपदार्थ पुरविणाऱ्याचे लसीकरण झालेले आवश्यक अथवा करोना नसल्याचा चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या गाडय़ांवर खाद्यपदार्थ घेऊन खाता येणार नाही. फक्त या गाडय़ांवर तयार झालेले खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील.

 

शाळा-महाविद्यालये बंद

सर्व प्रकारच्या शाळा व महाविद्यालये ३० तारखेपर्यंत बंद राहतील. फक्त इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षार्थीचा अपवाद करण्यात आला आहे. खासगी शिकवण्याही या काळात बंद राहतील.

 

धार्मिकस्थळे बंद

सर्व धार्मिकस्थळे या काळात बंद राहतील. फक्त दैनंदिन पूजाअर्जेस पुजाऱ्यांना परवानगी दिली जाईल.

केशकर्तनालये बंद केशकर्तनालये, स्पा, ब्यूटीपार्लर, सलोन्स बंद राहतील.

 

वृत्तपत्रांच्या वितरणाला परवानगी

वृत्तपत्रांची छपाई आण वितरणाला परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत वृत्तपत्रांचे वितरण करता येऊ शकेल.

 

राजकीय, धार्मिक समारंभांवर बंदी कायम

सर्व प्रकारचे राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिंक कार्यक्र मांवर सध्या लागू असलेली बंदी ३० तारखेपर्यंत कायम असेल. निवडणुका होणाऱ्या जिल्ह्य़ांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना तशा परवानग्या देण्यातचे अधिकार देण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यासाठी ५० जण तर अंत्यसंस्काराकरिता २० जणांनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. ई-काँमर्सला मात्र परवानगी असेल. कामगार परिसरातच राहात असल्यास इमारतीच्या बांधकामांना परवानगी दिली जाईल.

दहावी, बारावी परीक्षांचे काय? 

दहावी, बारावी परीक्षा पुढे ढकलाव्यात, असा सूर काही मंत्र्यांनी लावला होता. परीक्षांना अद्याप दोन आठवडय़ांचा कालावधी असल्याने पुढील आठवडय़ात परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊ, अशी भूमिका मुख्यमंत्री व काही ज्येष्ठ मंत्र्यांनी घेतली. मात्र, सध्या जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या काही विषयांची परीक्षा शनिवारीही होणार आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे निर्बंध कायम राहिल्यास या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत पेच निर्माण होणार आहे. र्निबधांमुळे अनेक विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठीही अडचण येऊ शकते, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांच्या राज्यातील परीक्षांचे काय असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यात ५७ हजार नवे रुग्ण

’मुंबई : राज्यात पहिल्यांदाच करोना रुग्णवाढीने ५० हजारांचा टप्पा ओलांडला. गेल्या २४ तासांत ५७,०७४ नवे रुग्ण आढळले. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख ३० हजार झाली.

’मुंबईत ११ हजारहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात करोनामुळे राज्यात २२२ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील एकू ण करोनाबाधितांची आतापर्यंतची संख्या ३० लाखांवर गेली.

’उपचाराधीन रुग्णांमध्ये पुणे ८१,३१७, मुंबई ६६,८०३, ठाणे ५३,२३०, नागपूर ५३,६३८ रुग्णांचा समावेश आहे.

अत्यावश्यक किं वा जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित सर्व दुकाने, बाजारपेठा आणि मॉल्स हे ३० तारखेपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवताना अंतरनियम पाळणे, कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले पाहिजे, अशा काही अटी घालण्यात आल्या आहेत. उद्याने, बागा, सागरी किनारे रात्री बंद राहतील तर सोमवार ते शुक्र वापर्यंत सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत खुली राहतील. सामान्य नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्यास दिवसाही हे बंद करण्याचे अधिकारी स्थानिक प्रशासनाला देण्यात आले.

सार्वजनिक वाहतुकीस परवानगी

मुंबईतील रेल्वे वाहतूक किं वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहणार आहे. सर्वसामान्यांच्या प्रवासावर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवासी, टॅक्सीत चालक आणि एकू ण क्षमतेच्या ५० टक्के  प्रवाशांना परवानगी असून, बसमध्ये उभ्याने प्रवास करता येणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करणाऱ्यांना मुखपट्टी वापरणे बंधनकारक आहे. अन्यथा ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

खासगी कार्यालये बंद

सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. बँका, वित्तीय सेवा, विमा, औषध कं पन्या, वीज, दूरध्वनी, सार्वजनिक उपक्र म आदी कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारी कार्यालये ५० टक्के  क्षमतेत सुरू ठेवता येतील. सरकारी कार्यालयांमध्ये अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही.