26 October 2020

News Flash

मुंबईकरांच्या चिंतेत भर : पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण देशाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त

मुंबईतील परिस्थिती काळजी करण्यासारखी

करोनानं जगभरात मृत्यूचं थैमान घातलं असून, भारतातही परिस्थिती चिंताजनक आहे. (संग्रहित छायाचित्र)

परदेशातून आलेल्या करोनाचा संसर्ग झालेल्या प्रवाशांमुळे मुंबईचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. प्रचंड गर्दी असणाऱ्या या शहरात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यात आता चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. मुंबईतील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण हे देशाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त आहे. हे प्रमाण देशात सरासरी ३ टक्के आहे, तर मुंबईत १५टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यावर काळजी व्यक्त केली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थितीवर लक्ष ठेवून संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या करण्याची सूचना आरोग्यमंत्र्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. या सगळ्यांमध्ये दिलासादायक बाब म्हणजे मुंबईसह देशात कुठेही अजून कम्युनिटी ट्रान्समिशन झालं नसल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसला सूत्रांनी माहिती दिली. “मुंबईतील परिस्थिती काळजी करण्यासारखी झाली आहे. देशात १२,७६,७८१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात ५०००० जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. म्हणजे देशातील पॉझिटिव्ह रूग्णांचं प्रमाण सध्या ३ टक्के आहे. दुसरीकडं मुंबईत ७३ चाचण्या करण्यात आल्या असून, ११००० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. म्हणजेच मुंबईतील करोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांचं प्रमाण १५ टक्के आहे,” अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली आहे.

मृत्युदर ३.९ टक्के

बुधवारी आणखी २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा ४१२ वर गेला आहे. मृतांमध्ये १५ पुरुष व १०महिला आहेत. तर सहा रुग्णांना कोणताही आजार नव्हता. मुंबईतील करोना रुग्णांचा मृत्युदर ३.९ टक्के आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन येत्या १५ दिवसात मुंबईत आणखी करोना काळजी केंद्र उभारण्याचे पालिकेने ठरवले आहे. महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू विज्ञान केंद्र, बीकेसी येथील एमएमआरडीए मैदान, माहीम निसर्गोद्यान, गोरेगाव येथील नेस्को मैदान या ठिकाणी करोना काळजी केंद्र -२ सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे करोना काळजी केंद्रातील खाटांची संख्या ३४ हजार होणार आहे. जे रुग्ण करोनाबाधित आहेत पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत अशा रुग्णांना या सीसीसी २ केंद्रात ठेवले जाणार आहे. विशेषत: जे रुग्ण झोपडपट्टय़ांमध्ये राहतात अशा रुग्णांना इथे ठेवले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 8:38 am

Web Title: coronavirus mumbai positivity rate 15 bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 विक्रमगडमधील मोगरा कोमेजला
2 बीएआरसी कंत्राटी कामगार वेतनाच्या प्रतीक्षेत
3 पाससाठी खिशाला खार
Just Now!
X