25 October 2020

News Flash

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आजही कराचीतच; एजाझ लकडावालाची माहिती

स्वतःची टोळी निर्माण करण्यापूर्वी लकडावाला हा दाऊदसाठी काम करीत होता.

दाऊद इब्राहिम आणि एजाझ लकडावाला

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा कराचीतच असल्याचा दावा त्याचा एकेकाळचा सहकारी आणि सध्या मुंबई पालिसांच्या अटकेत असलेल्या एजाझ लकडावाला याने केला आहे. लकडावालाच्या अटकेनंतर पहिल्यांदाच चौकशीदरम्यान त्याने दाऊदबाबतची ही माहिती उघड केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

दाऊद इब्राहिम राहत असलेल्या दोन निवासस्थानांची माहितीही लकडावाला याने मुंबई पोलिसांच्या चौकशीदरम्यान दिली आहे. स्वतःची टोळी निर्माण करण्यापूर्वी लकडावाला हा दाऊदसाठी काम करीत होता. खंडणीचे अनेक गुन्हे, हत्या आणि दंगल घडवल्याप्रकरणी तो मुंबई पोलिसांना हवा होता. मुंबई पोलिसांनी त्याला नुकतेच पाटण्याच्या विमानतळावरुन अटक केली आहे. लकडावालाविरोधात मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीसही बाजावली होती.

२००३ मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला अशी अफवा पसरली होती. मात्र, या हल्ल्यात एजाज लकडावाला वाचला होता. यानंतर तो बँकॉकहून कॅनडाला गेला होता आणि तिथेच गेल्या अनेक काळापासून वास्तव्य करत होता. एजाज लकडावाला याच्याविरोधात मुंबई आणि राजधानी दिल्लीत अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, खंडणी सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 7:01 pm

Web Title: dawood still in karachi reveals gangster ezaz lakdawala aau 85
Next Stories
1 ‘लंडन आय’च्या धर्तीवर साकारणार ‘मुंबई आय’; अजित पवारांची घोषणा
2 इमोशनल ब्लॅकमेलिंग, गर्लफ्रेंडने न्यूड फोटो पाठवल्यानंतर त्याने दाखवले खरे रंग
3 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवणार, मंत्रिमंडळाचा निर्णय
Just Now!
X