पालिका शाळांमधील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओकॉनऐवजी बोल्ड कंपनीचे टॅब देण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शुक्रवारी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन केली. अन्यथा या प्रकरणी न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने त्यांना टॅब देण्याची संकल्पना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. त्यानुसार यंदा इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते.