मुंबई : माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ज्ञानाची देवाण-घेवाण मराठी भाषेतून व्हावी, तसेच  आंतरजालावर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी भाषेतून पोहोचावे, यासाठी ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित’ (एमकेसीएल) यांनी ‘आयटीत मराठी’ हे उपयोजन (अ‍ॅप) तयार केले आहे.

गुगलचा वापर करून माहिती शोधणे व मराठी टंकलेखन, मराठीत बोलून भ्रमणध्वनीवर संदेश लिहिणे, मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे, मराठीतून  ई-शिक्षण, दैनंदिन जीवन आणि व्यवस्थापन  यांसाठी वेगवेगळ्या उपयोजनांचा व संकेतस्थळांचा मराठीतून वापर या गोष्टी या उपयोजनाच्या माध्यमातून शिकता येतील.  मराठी वर्तमानपत्र ऑनलाइन वाचणे, समाजमाध्यमांवर मराठीचा वापर, मराठी श्राव्यपुस्तके , कवितासंग्रह, शब्दकोश आदींची माहिती या उपयोजनाद्वारे मिळू शके ल.

http://www.mkcl.org/itmarathi   या लिंकवरून अथवा गुगल प्ले-स्टोअरवरून हे उपयोजन विनामूल्य डाऊनलोड करता येईल www.mkcl.org/marathi या संकेतस्थळावर त्याचा लाभ घेता येईल.