News Flash

आठवलेंना उपमुख्यमंत्री पद देऊ- तावडे

राज्यात महायुतीचे सरकार आल्यास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना उपमुख्यमंत्री पद देऊ अशी घोषणा भाजप नेते विनोद तावडे यांनी केली. शिवाजी पार्क येथील सभेत

| December 7, 2013 02:17 am

राज्यात महायुतीचे सरकार आल्यास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना उपमुख्यमंत्री पद देऊ अशी घोषणा भाजप नेते विनोद तावडे यांनी केली. शिवाजी पार्क येथील सभेत त्यांनी ही घोषणा केली.
  डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला तावडे उपस्थित होते. आम्ही आठवलेंचा विश्वासघात करणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
 महायुतीची सत्ता आल्यास रामदास आठवलेंना नक्की उपमुख्यमंत्रीपद देऊ असे ते म्हणाले. आठवलेंना राज्यसभेवर जायचे आहे. महाराष्ट्रातून नाही जमलं तर बिहार किंवा मध्यप्रदेशातील भाजपाच्या जागेवरून त्यांना राज्यसभेवर पाठवले जाईल असे आश्वासनही तावडे यांनी यावेळी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:17 am

Web Title: deputy chief minister post will be given to athawale vinod tawde
Next Stories
1 काँग्रेस नगरसेवक शिवा शेट्टी यांच्यावर हल्ला
2 इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन पदपथावरच उरकले
3 आरोग्य खात्यातील कंत्राटी डॉक्टरांना अपघात विमाकवच
Just Now!
X