डॉकयार्ड येथील महानगरपालिकेची इमारत कोसळून ६१ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनेला आज, शनिवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र या दुर्घटनेतील कुटुंबांना अजूनही महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून पूर्ण मदत मिळू शकलेली नाही.
डॉकयार्ड येथील बाबू गेनू मंडईनजिकची पालिकेची निवासी इमारत २७ सप्टेंबर २०१३ रोजी सकाळी कोसळली होती. तेथे राहत असलेल्या महानगरपालिकेचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेत बळी पडले. या दुर्घटनेनंतर पालिका आणि राज्य सरकारने दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याची अनेक आश्वासने दिली. मात्र वर्ष पूर्ण झाले तरी  अनेक आश्वासने हवेत विरल्याचा अनुभव दुर्घटनाग्रस्तांना येत आहे.
मृतांच्या कुटुंबियांना एक लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीतून देण्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र एकाही कुटुंबाला तो आजतागायत देण्यात आलेला नाही.
पालिकेकडून तातडीने मदत देण्यात आली. तसेच १० कुटुंबांची राहण्याची व्यवस्था भायखळा येथील सिम्प्लेक्स मिलमधील म्हाडाच्या संक्रमण शिबिरात वर्षभरासाठी करण्यात आली. मात्र वर्ष होत आलेले असताना पुढील व्यवस्थेबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून हालचाल झालेली नाही, असे येथील रहिवासी तुषार पवार यांनी सांगितले. खास प्रतिनिधी, मुंबई : डॉकयार्ड येथील महानगरपालिकेची इमारत कोसळून ६१ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनेला आज, शनिवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र या दुर्घटनेतील कुटुंबांना अजूनही महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून पूर्ण मदत मिळू शकलेली नाही.
डॉकयार्ड येथील बाबू गेनू मंडईनजिकची पालिकेची निवासी इमारत २७ सप्टेंबर २०१३ रोजी सकाळी कोसळली होती. तेथे राहत असलेल्या महानगरपालिकेचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेत बळी पडले. या दुर्घटनेनंतर पालिका आणि राज्य सरकारने दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याची अनेक आश्वासने दिली. मात्र वर्ष पूर्ण झाले तरी  अनेक आश्वासने हवेत विरल्याचा अनुभव दुर्घटनाग्रस्तांना येत आहे.
मृतांच्या कुटुंबियांना एक लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीतून देण्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र एकाही कुटुंबाला तो आजतागायत देण्यात आलेला नाही.
पालिकेकडून तातडीने मदत देण्यात आली. तसेच १० कुटुंबांची राहण्याची व्यवस्था भायखळा येथील सिम्प्लेक्स मिलमधील म्हाडाच्या संक्रमण शिबिरात वर्षभरासाठी करण्यात आली. मात्र वर्ष होत आलेले असताना पुढील व्यवस्थेबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून हालचाल झालेली नाही, असे येथील रहिवासी तुषार पवार यांनी सांगितले.